(म्हणे) ‘महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची आवश्यकता नाही !’ – अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई उपनगर, काँग्रेस
मुंबई – लोकांचे हाल होत आहेत, त्यांना नोकर्या नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी गाय वाचवण्यासाठी कायदा करणे योग्य नाही. भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात अनेक गायी गोशाळेत उपाशी मरण पावल्या होत्या. महिलांची सुरक्षा, नोकर्या, कोरोनातून कसे सावरणार, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लव्ह जिहादसारख्या फालतू गोष्टींना महाराष्ट्रात थारा नाही. त्यामुळे राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याची आवश्यकता नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. (केरळ उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांचे दाखले दिले आहेत. ब्रिटनने लव्ह जिहाद सर्वप्रथम जगासमोर आणला आहे. संपूर्ण देशात लव्ह जिहादच्या प्रकरणांचा नंगा नाच अद्यापही चालू आहे. असे असतांना कुणाला लव्ह जिहाद दिसत नसेल, तर ते जगातील एक आश्चर्यच म्हणावे लागेल ! – संपादक)
(सौजन्य : Republic World)
‘लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्रातही कायदा करावा ! – किरीट सोमय्या, भाजप
अस्लम शेख यांनी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केला होता. ‘फेनेटीक इस्लामिक ऑर्गनायझेशन’ संघटनेचेही शेखकडून समर्थन करण्यात आले होते, असे सांगून ‘लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्रातही कायदा करावा’, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.
(सौजन्य : HW News Network)
‘उत्तरप्रदेश सरकारच्या लव्ह जिहादचा कायदा करण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. उत्तरप्रदेशसारखा कायदा महाराष्ट्रातही लागू करण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचा रंग पालटला’, अशी टीका सोमय्या यांनी या वेळी केली.