हिंदुत्वाचा र्‍हास होत असतांना निद्रिस्त असलेले केरळमधील हिंदू !

काश्मिरी पंडितांविषयी काय झाले, हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्याविषयी जे घडले, ते शेकडो वर्षांपूर्वी घडलेले नसून अगदी अलीकडेच घडले आहे; परंतु त्यामधून कुणीही काही शिकले नाही. हिंदू असेच असून त्यांना इतिहासापासून शिकायची इच्छा नाही. जोपर्यंत संकट दारापर्यंत येत नाही, तोपर्यंत ते विश्‍वास ठेवत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळमधील हिंदू ! जिहाद्यांपासून त्यांना पुष्कळ त्रास झाला. वर्ष १९२१ मधील मोपला दंगलीविषयी प्रत्येक जण बोलतो. या दंगलीत जिहाद्यांनी सहस्रो हिंदूंची हत्या केली, शेकडो हिंदु महिलांवर बलात्कार केले, शेकडो हिंदु महिलांचे धर्मांतर केले. तरीही जे काही घडले, ते भूतकाळात घडले, असा विश्‍वास हिंदू ठेवतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे साम्यवाद ! डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी या घटना लपवून किंवा त्यांचा वेगळा अर्थ लावून अभ्यासक्रम सिद्ध केला. याचा परिणाम म्हणजे अल्पसंख्यांक मदरशांमध्ये लहानपणापासूनच मागचा इतिहास शिकून त्यांचे पुढचे नियोजन काय आहे, हे ते ठरवतात. या उलट आपण हिंदू मुलांना ‘सर्वधर्म समान आहेत आणि जे काही चमकते ते सर्व सोने आहे’, अशी शिकवण देतो.

श्री. प्रदीश विश्‍वनाथ

हिंदूंची जमीन आणि संपत्ती अल्पसंख्यांकांच्या घशात घालण्याचे काँग्रेस आणि साम्यवादी यांचे राजकारण

केरळमध्ये असलेले सी.पी.एम्. (साम्यवादी) आणि काँग्रेस यांचे नेतृत्व अल्पसंख्यांकांची बाजू बळकट करणे अन् हिंदूंची बाजू कमकुवत करणे यांवर भर देत आहे. साम्यवाद्यांच्या सरकारने ‘जमीन सुधारणा कायदा’ केल्याने केवळ हिंदु समाजाची हानी झाली. साम्यवाद्यांनी आणलेल्या या जमीन सुधारणा कायद्यानुसार ‘प्रत्येक हिंदूने स्वतःकडे अधिक असलेली जमीन हिंदु मागासवर्गियांना द्यावी’, असा नियम केला; परंतु याचा परिणाम हिंदु धर्मातील उच्च जातीय हिंदूंनी स्वतःची जमीन गमावली आणि ती मागासवर्गियांना कधीच मिळाली नाही. मागासवर्गीय समाजातील लोक अजूनही वसाहती करून रहातात आणि उच्च जातीय हिंदूंनी काळाच्या ओघात स्वतःची संपत्ती तसेच जमीनही गमावली. याउलट केरळमधील मुसलमान समाज श्रीमंत होत गेला.

केरळ ‘इस्लामिक राज्य’ करण्याची अल्पसंख्यांकांची नीती

येथील मुसलमान समाज एका विशिष्ट हेतूने ही मोहीम राबवत आहे. केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस्. अच्युतानंदन यांनी जाहीरपणे मान्य केले की, येत्या २ दशकांमध्ये केरळ ‘इस्लामिक राज्य’ करण्याचे ध्येय समोर ठेवून ते काम करत आहेत. ते आपली लोकसंख्या कितीतरी पटीने वाढवत आहेत. आपण जर ७ वर्षांखालील मुलांची संख्या लक्षात घेतली, तर मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. केरळमध्ये मुसलमानांचा जननदर वर्षाला ४३ टक्के आणि हिंदूंचा जननदर ४१ टक्के आहे. तसेच हिंदूंचा मृत्यूदर वर्षाला ६० टक्के, तर मुसलमानांचा मृत्यूदर जवळजवळ २० टक्के आहे. यावरून लक्षात येते की, हिंदूंमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे आणि त्यामुळेच हिंदूंचे मृत्यूदराचे प्रमाण अधिक आहे. दोन्ही समाजांचा जननदर आणि मृत्यूदर यांचे प्रमाण लक्षात घेता येत्या १० वर्षांत केरळ हे संपूर्ण ‘इस्लामिक राज्य’ होईल, असा निष्कर्ष काढता येईल.

लोकसंख्या वाढवणे, हेच एकमेव हत्यार नाही. दुसरे हत्यार आहे ते म्हणजे व्यापारमधील जिहाद ! आपण जर हिंदु बहुसंख्य असलेल्या त्रिवेंद्रम या शहरातील एम्.जी. रस्त्याला गेलो, तर तिथे बिगर मुसलमान मालक असलेले एखादेच दुकान दिसेल. पिझ्झा कॉर्नर, उपाहारगृहे, बेकरी, चपलांची दुकाने, कपड्यांची दुकाने, रसगृहे, भ्रमणभाष विक्री करणारी दुकाने ही सर्व दुकाने मुसलमानांच्या मालकीची आहेत. तसेच तिथे काम करणारे कर्मचारी उत्तर केरळमधील मलप्पूरम्, कासारगोड या शहरांतील आहेत. या कर्मचार्‍यांचा खासगी लष्कर म्हणूनही उपयोग केला जातो. याचसमवेत त्यांना जर जवळपासच्या मशिदीच्या ध्वनीक्षेपकांवरून विशिष्ट प्रकारचा संकेत मिळाला, तर ते काही वेळातच रस्त्यावर येतात. बेंगळुरू येथे घडलेली दंगल हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्या वेळी काही मिनिटांतच सहस्रो धर्मांध एकत्र आले.

स्वाभिमान विसरून मुसलमानांकडे निमूटपणे चाकरी करणारे हिंदू !

मुसलमानांकडून चालवल्या जाणार्‍या व्यापारी आस्थापनांमध्ये हिंदु स्वाभिमान मारला जातो. बहुतांश व्यापारी केंद्रे ही मुसलमानांकडून चालवली जातात आणि तेथील कर्मचारी हिंदु महिला आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून या महिलांना लक्ष्य केले जाते. साम्यवादामुळे राज्यात नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे केरळमधील लोक ज्यामध्ये हिंदूही आहेत, हे अरब देशांमध्ये राहून त्यांच्या हाताखाली काम करू लागले, म्हणजे मुसलमान मालक आणि हिंदू त्याचा नोकर, असे झाले. यामुळे राज्यातील अनेक हिंदूंची मनोवृत्ती पालटली. त्यांचा स्वाभिमान हरवला आणि आता आपल्या पोटापाण्यासाठी मुसलमानांवर अवलंबून रहाण्यात त्यांना कोणतीच लाज वाटत नाही.

केरळमध्ये मुसलमानांना व्यापारी साम्राज्य निर्माण करण्यास देण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण

ज्या वेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती, तेव्हा उद्योग खाते केवळ मुस्लीम लीगला देण्यात आले. यामुळे त्यांच्या समाजाला त्यांचे व्यापारी साम्राज्य निर्माण करण्यास साहाय्य झाले. आकडेवारी काढली तर लक्षात येते की, राज्यात हिंदूंच्या मालकीची केवळ २२ टक्के जमीन आहे. तसेच व्यापाराच्या दृष्टीने हिंदूंची मालकी १७ टक्के आहे आणि त्यांचे अधिकोषातील व्यवहार केवळ १५ टक्के आहेत. यावरून राज्यात खर्‍या अर्थाने कोण अल्पसंख्यांक आहे आणि कोणत्या समाजाला दुःख भोगावे लागत आहे, ते लक्षात येते.

हिंदूंचा उरलासुरला स्वाभिमान नष्ट करण्यासाठी साम्यवाद्यांकडून नास्तिकतेचा प्रचार

असे असले तरी अजूनही तेथील हिंदूंना धोका कळलेला नाही. ते अजूनही ‘जमात-ए-इस्लामी’ आणि साम्यवादी यांच्या प्रचाराला बळी पडत आहेत. ‘केरळमध्ये चांगले शिक्षित लोक आहेत. त्यामुळे हिंदूंचे एकत्रीकरण होऊच शकणार नाही’, असा प्रचार ते केरळमध्ये करतात. अंधपणे वागणार्‍या हिंदूंची ते स्तुती करत असल्याने हिंदूंना वास्तव कळत नाही. दुसरीकडे मुस्लीम लीग आमदारांच्या २० हून अधिक जागा मिळवतो, त्यातील २ मंत्री होतात आणि २ खासदार होतात. आताचा नवीन प्रकार म्हणजे साम्यवादी पक्ष हा हळूहळू जिहाद्यांच्या घशात जात आहे आणि ते हिंदूंचा उरलासुरला स्वाभिमान नष्ट करण्यासाठी नास्तिकतेचा प्रचार करत आहेत.

लव्ह जिहादचा धोका ओळखून त्याविरुद्ध प्रचार करणारे ख्रिस्ती पाद्री

मुख्य प्रवाहातील चर्चकडून होणार्‍या धर्मांतराचे प्रमाण आता अल्प झाले आहे; परंतु भूतकाळात त्यांनी बरीच हानी केली. जमीन सुधारणा कायद्यामागे त्यांचे डोके होते. या कायद्यातील पळवाटा शोधून त्यांनी साम्यवादी सरकारकडून मालमत्ता आणि संपत्ती मिळवली आणि हिंदूंनी आपल्या जमिनी गमावल्या. आता हा मार्ग नवीन पिढीच्या चर्चकडून अवलंबला जात आहे. या नवीन पिढीच्या मुख्य प्रवाहातील चर्चसाठीही धोकादायक बनल्या आहेत. आता ख्रिस्ती समाजालाही लव्ह जिहादचा फटका बसत आहे. हा धोका लक्षात आल्यावर आता अनेक ख्रिस्ती पाद्री उघडपणे जिहाद्यांच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्या समाजासाठी हे चांगले चिन्ह आहे; परंतु हिंदु समाज मात्र अजूनही निद्रिस्त आहे आणि तो वास्तव लक्षात घेऊन जागा होत नाही. ते अजूनही साम्यवादी, ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि जिहादी यांनी निर्माण केलेल्या सुंदर भूमीत रहात आहेत. ते हिंदूंना शिकवत आहेत की, केवळ वाईट लोक एकत्रित येत असल्यामुळे तुम्ही असे काही करू नका आणि हिंदू ते ऐकून एकत्रित येणार नाहीत.

भारताच्या एकात्मतेला धोकादायक ठरेल, अशी केरळ राज्यामधील स्थिती

दुसर्‍या बाजूने केरळ राज्य हे भारतातील अस्थिरतेची छुपी राजधानी होत आहे. सर्व जिहादी आणि साम्यवादी यांच्या कारवायांचे नियोजन केरळमधून होते. तसेच भारतातील ख्रिस्त्यांना धर्मांतराविषयी केरळमधूनच मार्गदर्शन होते. धर्मांतरासाठी जवळजवळ ६५ सहस्र नन्स धर्मांतराच्या मोहिमेसाठी भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या आहेत. इसिस या संघटनेत भरती झालेल्यांपैकी बहुतांश संख्येने केरळमधील लोक आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वेळी विरोध करण्यासाठी केरळमधून नियोजन झाले आणि केरळमधून गेलेल्या लोकांनी तिथे दंगली घडवून अस्थिरता निर्माण केली; म्हणून केंद्र सरकारने या गोष्टींमध्ये लक्ष घालून याला लवकरात लवकर आळा घालणे आवश्यक आहे.

केरळमधील हिंदु समाजाला बळकट करण्यासाठी हिंदूंनी जागृत होण्याची आवश्यकता

जर आपण केरळ राज्य गमावले, तर धर्मांधांना भारतात राहून स्वतःच्या कारवाया करण्यास आणि त्यानंतर भारतात अजून फूट पाडण्यास सोपे जाईल. ते मिळालेल्या संधीचे भांडवल करून प्रत्येक वेळी भारताची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न करतात. आता आपण थांबून किंवा एक मिनिटही वाया घालवून उपयोग नाही. या सर्वांचे परस्पर संबंध अल्प करण्यासाठी सर्व पर्याय निवडून हिंदु समाजाला बळकट केले पाहिजे. आपल्याकडे बघण्यासाठी किंवा वाया घालवण्यासाठी पुष्कळ वेळ नाही. हे असेच चालू राहिले, तर येत्या १० वर्षांत केरळ म्हणजे दुसरे काश्मीर होईल. काश्मिरी हिंदूंप्रमाणे केरळमधील हिंदूंना परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे उठा, जागे व्हा आणि लवकरात लवकर जे शक्य आहे, ते करायला प्रारंभ करा.

– श्री. प्रदीश विश्‍वनाथ, हिंदुत्वनिष्ठ, केरळ.

http://pratheeshviswanath.in/