तेलंगाणा वक्फ बोर्डाच्या सीईओंना हटवण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश
वक्फ बोर्डाच्या भूमीवरील अतिक्रमण हटवण्यास निष्क्रीय राहिल्याचा आरोप
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा उच्च न्यायालयाने नुकतेच तेलंगाणाच्या वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) महंमद कासिम यांना तात्काळ बडतर्फ करण्याचा आदेश सरकारला दिला आहे. ‘त्यांच्या जागेवर अशा व्यक्तीला नियुक्त करा, जी या बोर्डाच्या संपत्तीचे रक्षण करू शकेल’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले आहे. राज्यात वक्फ बोर्डाची १ लाख कोटी रुपयांची भूमी आहे.
Telangana HC Finds Wakf Board CEO Complicit In Encroachment Of Muslim Graveyards, Orders His Removalhttps://t.co/Zi3GZvf64c
— Swarajya (@SwarajyaMag) November 17, 2020
महंमद कासिम यांनी बोर्डाच्या भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्यास कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालयाने त्यांना अतिक्रमण करणार्यांशी हातमिळवणी केल्याचे म्हटले.