देहली येथे पत्रकार परिषदेच्या वेळी सभागृहाची स्वच्छता करतांना आलेल्या अनुभूती
१. साधकांनी सभागृहाची स्वच्छता आणि शुद्धी केल्यावर चैतन्यमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहून स्थानिक कर्मचारी प्रभावित होणे
‘देहली येथील पत्रकार परिषदेपूर्वी सभागृहाची स्वच्छता तेथील एका स्थानिक स्त्री आणि पुरुष कर्मचार्यांनी केली होती; परंतु नंतर साधकांनी आवश्यक ती सभागृहाची स्वच्छता आणि शुद्धी केली. तेथील स्त्री कर्मचारी हे सर्व उत्सुकतेने पहात होती. साधकांनी भगवान श्रीकृष्णाचे चित्र सभागृहात ठेवले. तेव्हा तिचा भाव जागृत झाला. गोमूत्रमिश्रित पाण्याचा फवारा मारतांना सभागृहात सुगंध पसरला होता. नंतर सनातन उदबत्ती लावली. तेव्हा तेथे वेगळेच चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. हे पाहून ती स्त्री कर्मचारी सहकर्मचार्याला म्हणाली, ‘‘तुम्ही स्वच्छता केल्यानंतर त्यांनी सभागृहाची त्यांच्या पद्धतीने स्वच्छता केली आणि सुगंधी पाण्याच्या फवार्यानेही शुद्धी केली.’’
२. गोमूत्रमिश्रित पाण्याचा फवारा मारल्यानंतर अतिशय सुगंध पसरला होता. तेव्हा ‘त्यात अत्तर घातले आहे’, असे मला वाटले; म्हणून मी एका साधकाला विचारले असता तो म्हणाला ‘‘नाही सद्गुरु काका. अत्तर नव्हते. त्यात केवळ गोमूत्र होते.’’
३. पत्रकार परिषदेनंतर त्या स्त्रीने एका साधिकेला सांगितले, ‘‘मै भी कान्हा की भक्त हू । आपके अगरबत्तीसे बहुत अच्छी सुगंध आती है । मुझे वो अगरबत्ती देना ।’’
(प्रत्यक्षात भगवंताने गोमूत्राच्या पाण्याच्या फवार्यातून तेथे अत्तरासारखा दिव्य गंध पसरवून त्याच्या भक्ताला जोडून घेतले, तसेच तेथे निर्माण झालेल्या चैतन्यामुळे अनेक पत्रकारांनी अधिवेशनाच्या कार्याला आवश्यक ती प्रसिद्धी दिली.)
‘सतत आध्यात्मिक स्तरावर राहून समाज आणि राष्ट्र कार्य केल्यास भगवंत काही जणांना आध्यात्मिक स्तरावरही जोडून घेतो’, हे अनुभवण्यास मिळाले.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |