सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाला पाक सीमेवर तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक

अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

श्रीगंगानगर (राजस्थान) – पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या रवींद्र सिंह या सैनिकाला पाकसाठी शस्त्र आणि अमली पदार्थ यांची तस्करी केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. तो भारत-पाक सीमेवर श्रीगंगानगर येथे तस्करी करत होता. पोलिसांनी एकूण तिघांना या प्रकरणी अटक केली आहे.

बंगालमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याला पशू तस्करी प्रकरणी अटक

 


केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सीमा सुरक्षा दलाच्या ३६ व्या बटालियनचे माजी कमांडंट सतीश कुमार यांना भारत-बांगलादेश सीमेवर पशू तस्करीच्या प्रकरणी अटक केली आहे. सध्या ते छत्तीसगडच्या रायपूर येथे तैनात आहेत. यापूर्वी त्यांच्या घरावर धाडीही टाकण्यात आल्या असून त्यांचे कोलकाता येथील घर सील करण्यात आले आहे.