माकपकडून जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप करत दलित महिला इस्लाम स्वीकारण्याच्या सिद्धतेत !
माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष असल्याचाही आरोप
|
कन्नूर (केरळ) – राज्यातील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून जातीच्या आधारे भेदभाव केला गेल्याने मी आता इस्लामचा स्वीकार करणार आहे, असे येथील चित्रलेखा नावाच्या दलित हिंदु महिला रिक्शाचालिकेने सांगितले आहे. चित्रलेखा यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही घोषणा केली आहे. चित्रलेखा यांनी पूर्वी आरोप केला होता की, जातीमुळे माकपच्या कार्यकर्त्यांनी काम करण्यास दिले नाही. माझी रिक्शाही जाळून टाकली होती.
Dalit woman auto-driver says she plans to convert to Islam alleging caste discrimination by the CPM government in Keralahttps://t.co/Wsn3484SED
— OpIndia.com (@OpIndia_com) November 18, 2020
चित्रलेखा यांना २ वर्षांपूर्वी कन्नमपल्ली येथे मागील माकप आघाडी सरकारने घर बनवण्यासाठी भूमी आणि धन देण्याचे घोषित केले होते; मात्र आताच्या माकप सरकारने हा निर्णय रहित केला. याविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले. ‘न्यायालयाकडूनही न्याय मिळण्याची शक्यता अल्प झाल्याने मी दलित ओळख सोडून इस्लाम स्वीकारणार आहे’, असे चित्रलेखा यांनी म्हटले आहे. ‘माकप एक ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी पक्ष आहे’, असा आरोपही त्यांनी केला.