संयुक्त अरब अमिरातकडून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद

कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे निर्णय

अबूधाबी – संयुक्त अरब अमिरातने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान, तुर्कस्तान, येमेन, सीरिया, इराक, इराण, सोमालिया, लिबिया, केनिया आणि अफगाणिस्तान या देशांतील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा देणे बंद केले आहे. ‘कोरोनाच्या संभाव्य दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा’, असे म्हटले जात आहे.

गेल्या आठवड्याभरात पाकमध्ये २ सहस्र कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून मासामध्ये पाकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यावर संयुक्त अरब अमिरातने प्रवासी सेवा बंद केली होती.