सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सदर्याच्या रंगातील छटांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
सद्गुरु डॉ. पिंगळे यांच्या सदर्यावर पिवळ्या रंगाची छटा दिसणे, त्यांच्या हाताची त्यांच्या पांढर्या सदर्यावर पडलेली सावली पिवळी दिसणे आणि त्यांच्या छायाचित्रात त्यांची सावली पिवळ्या रंगाची दिसणे
‘२७.७.२०२० या दिवशी सकाळी ८.३० वाजता सद्गुरु पिंगळेकाका अल्पाहार करण्यासाठी बसले होते. तेव्हा मला सद्गुरु काकांच्या सदर्यावर पिवळ्या रंगाची छटा दिसली. सद्गुरु काकांच्या हाताची सावली त्यांच्या पांढर्या सदर्यावर पिवळी दिसत होती. याचे छायाचित्र काढल्यानंतरसुद्धा ती स्पष्टपणे दिसत होती. संपूर्ण सदरा पांढर्या रंगाचा होता. त्यांच्या उजव्या हाताचा भाग आणि पोटाचा वरचा भाग यांवर पिवळी छटा आलेली दिसली, तसेच त्यांच्या छायाचित्रामध्ये त्यांची जी सावली पडत होती, तीसुद्धा पिवळ्या रंगाची दिसत होती. सामान्यतः सावली काळ्या रंगाची असते; परंतु त्यांची सावली पिवळी होती.’
– कु. मनीषा माहुर, देहली (२८.७.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |