घोटाळ्याचा आरोप असणार्या बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे त्यागपत्र
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री आणि काही मंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. यात शिक्षणमंत्रीपद जनता दल (संयुक्त)चे डॉ. मेवालाल चौधरी यांना देण्यात आले होते; मात्र त्यांच्यावर साहाय्यक प्राध्यापक नियुक्तीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप असल्यामुळे टीका होऊ लागली. त्यामुळे डॉ. चौधरी यांनी दोनच दिवसांत त्यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र दिले आहे.
(सौजन्य : इंडिया टुडे)
याविषयी डॉ. चौधरी म्हणाले की, कोणताही खटला तेव्हा सिद्ध होतो, जेव्हा तुमच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट झाले आहे किंवा न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. माझ्या विरोधात आरोपपत्रही नाही आणि गुन्ह्याची नोंदही झालेली नाही.