आरोग्य आणि आयुर्वेद यांची सांगड घाला !
आयुर्वेदाने सांगितलेले नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिनचर्या किंवा ऋतुचर्या आखल्यास ‘जीवेत शरदः शतम् ।’ याप्रमाणे १०० वर्षे आरोग्यसंपन्न आयुष्य जीवन जगा, हा आयुर्वेदीय ऋषीमुनींचा आशीर्वाद प्रत्येकाला निश्चितच मिळेल.
आयुर्वेदाच्या वाढीसाठी समाजातील विचारवंतांनी विविध सदरांतून सार्वजनिक व्यासपीठ, वर्तमानपत्रे आणि विविध प्रचारप्रसार माध्यमे या माध्यमातून त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करायला हवा. तसे झाल्यासच आयुर्वेदाची आग्रही मागणी जोर धरू लागेल. त्यातूनच आयुर्वेदाचे जतन आणि संवर्धन होईल. आयुर्वेदाचा अंगीकार करणे ही काळाची आवश्यकता असून आयुर्वेदाला त्याचे पुनर्वैभव प्राप्त करून देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे !