आयुर्वेदानुसार व्यायाम केल्याने होणारे लाभ !
व्यायामामुळे शरीर अन् सूक्ष्मचक्रे यांतील काळे आवरण नष्ट होऊन त्यांची शुद्धी होणे
‘व्यायामामुळे शरिरातील सूक्ष्मचक्रांच्या (सप्तचक्रांच्या) भोवती असलेले काळ्या शक्तीचे आवरण चक्रांच्या जागी (म्हणजेच त्या बिंदूवर) दाब आल्याने प्रारंभी विरळ होते. व्यायाम करण्यामध्ये सातत्य ठेवल्यास ते नष्ट होते. त्यामुळे सूक्ष्मचक्रांच्या अधिपत्याखाली असलेल्या अवयवांमधील काळी शक्ती विरळ होते आणि शरिरातील सूक्ष्मचक्रांची शुद्धी होऊन देहातील चैतन्य वाढते.
व्यायामामुळे स्नायू आणि हाडे यांची कार्यक्षमता वाढणे
व्यायामामुळे होणार्या स्नायू आणि हाडे यांच्या लयबद्ध हालचाली, स्नायूंचे आकुंचन आणि प्रसरण या क्रियांमुळे स्नायू अन् हाडे यांच्याभोवती असलेले काळ्या शक्तीचे थर, म्हणजेच रज-तम कणांचे बंध विरळ होतात. स्नायू आणि हाडे मोकळी होऊन त्यांतील जडत्व कमी होऊन हलकेपणा जाणवतो आणि शिथिलता अल्प होऊन कार्यक्षमता वाढते. व्यायाम करतांना प्रार्थना आणि नामजप केल्यास स्नायू आणि हाडे यांची चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढून ते टिकून रहाते.
व्यायामामुळे क्षात्रवृत्ती वाढणे
साधकांसाठी व्यायाम करणे, हे युद्ध असून व्यायामामुळे साधकाची क्षात्रवृत्ती ३० टक्क्यांनी वाढते.
व्यायामामुळे मेंदू आणि मन यांना जोडणारा कृष्णतत्त्वाचा बंध प्रकाशमान होऊन चैतन्य मिळणे
व्यायामामुळे मनातील रज-तम कण न्यून होऊन काळ्या शक्तीचे आवरण अल्प होते. त्यामुळे मनाची शक्ती २ टक्क्यांनी वाढते. व्यायामामुळे मन आणि मेंदू यांना जोडणारा कृष्णतत्त्वाचा बंध प्रकाशमान होऊन त्याचे चैतन्य मनामध्ये परावर्तित होते. त्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी होते. हेच चैतन्य पुढे शरिरातील सर्व अवयवांमध्ये पसरते. त्यामुळे काळी शक्ती नष्ट होऊन व्यायाम करणार्या व्यक्तीचे शरीर चमकदार आणि चैतन्यमय दिसते.
व्यायामामुळे शरिरातील ऊर्जा आणि रस यांचे शक्ती अन् चैतन्यरस यांत रूपांतर होणे
आयुर्वेदामध्ये ‘व्यायाम हा शरिरातील रस आणि तेजतत्त्व जागृत करणारा आहे’, असे म्हटले आहे. व्यायामामुळे शरिरामध्ये तयार होणारी ऊर्जा आणि रस साठवले जाते. पुढे त्यांचे शक्ती आणि चैतन्यरस यांत रूपांतर होते. त्यामुळे शरीर आणि मन यांची शुद्धी होऊन कार्यक्षमता वाढते. शरिरातील रस जागृत झाल्याने शरिरातील आपतत्त्वाचे प्रमाण संतुलित रहाते. शरिरामध्ये (सूक्ष्मरूपात) असणारी टाकाऊ मूलद्रव्ये चरबीच्या स्वरूपात असतात. ती व्यायामामुळे घामाच्या द्वारे बाहेर पडतात.’ – सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वर्ष २००६)