केसांची निगा कशी राखाल ?

केस हा पिंडाचा रज-तमात्मक भाग असल्याने या माध्यमातून वाईट शक्तींचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे केसांचे नैसर्गिक सौंदर्य टिकण्यासाठी बाह्य उपचारांपेक्षा केसांची आध्यात्मिक स्तरावर काळजी घेणे अधिक सयुक्तिक ठरते. केसांच्या संदर्भातील धार्मिक आचार जिवाला केसांच्या माध्यमातून होणारा वाईट शक्तींचा त्रास उणावण्यास आणि त्यापासून संरक्षण करण्यास साहाय्य करतात.

निरोगी केसांसाठी काळजी घेण्याविषयीची उपयुक्त सूत्रे

  • अंघोळीपूर्वी केस विंचरावेत.

  • स्त्रियांनी मध्यभागी भांग पाडावा.

  • आंबाडा किंवा वेणी अशी सात्त्विक केशरचना करावी.

  • अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी केस धुऊ नयेत.

  • केस धुण्याच्या पाण्यात गोमूत्र किंवा विभूती टाकावी.

  • प्राणायाम, शीर्षासन, मत्स्यासन यांमुळे डोक्याकडे रक्तप्रवाह जाऊन केसांचे आरोग्य सुधारते.

  • मानसिक ताणाने केस गळत असतील तर शवासन करणे उपयुक्त ठरते.

  • रसायनमिश्रित द्रव्याने केस धुण्याऐवजी नैसर्गिक द्रव्यांनी (शिकेकाई, रिठा, लिंबू, आवळा, जास्वंद, कोरफड) केस धुवावेत.

  • केस निरोगी रहाण्यासाठी आहारात तिळाचे किंवा खोबरेल तेल, आवळा, भोकर, आंबा, नारळ, चोळी यांचा समावेश करावा, अतिरिक्त मीठ खाणे टाळावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘केसांची घ्यावयाची काळजी’)