आयुर्वेद हे विलंबाने नव्हे, तर लगेच गुण देणारे शास्त्र !
‘महर्षि वाग्भटांनी आपल्या ग्रंथात रोगांवर उपचार सांगणारे ‘चिकित्सास्थान’ नावाचे प्रकरण रचल्यावर या प्रकरणाविषयी पुढील श्लोक लिहून ठेवला आहे. –
आयुर्वेदफलं स्थानम् एतत् सद्योऽर्तिनाशनम् ।
– अष्टांगहृदय, चिकित्सास्थान, अध्याय २२, श्लोक ७३
अर्थ : या ग्रंथातील चिकित्सास्थानात सांगितलेले उपचार ताबडतोब दुःखाचा नाश करणारे आहेत; म्हणून चिकित्सास्थान हे आयुर्वेदाचे फळ आहे.
फार प्राचीन काळापासून आयुर्वेद हे लगेच गुण देणारे शास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.
गुरुकुल शिक्षणपद्धतीचा लोप झाल्याने आयुर्वेदाचे परिपूर्ण ज्ञान असणार्या वैद्यांची संख्या तुलनेने अल्प आहे. बहुतेक वैद्य रुग्णाची प्रकृती, रोगाची कारणे इत्यादींचा विचार न करता अॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदीय उपचार करत (चिकित्सा देत) असल्याने आणि रुग्णही पथ्ये इत्यादी नीट पाळत नसल्याने ‘आयुर्वेदीय औषधांनी विलंबाने गुण येतो’, हा अपसमज रूढ झाला आहे.’
(पुढे येणार्या हिंदु राष्ट्रात गुरुकुल पद्धतीनुसार आयुर्वेदाचे शिक्षण देण्यात येईल. – संपादक)
– वैद्य मेघराज माधव पराडकर, आयुर्वेदीय चिकित्सक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०१४)