काही आजारांवरील आयुर्वेदीय उपाय
डोळ्यांत खाज येणे
द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.
डोळ्यांत धुरकटपणा जाणवणे
या विकाराच्या प्रारंभिक अवस्थेत आवळ्याचा रस थोड्या पाण्यात मिसळून सकाळ, संध्याकाळ प्यायल्याने फायदा होतो.
मोतीबिंदू
प्रतिदिन १ थेंब मध डोळ्यांत टाकल्याने एका मासात फरक पडतो. मधामुळे बुबुळांची पारदर्शिता वाढते आणि डोळ्यांवरील ताण न्यून होतो.
टायफॉईड
दालचिनीची भुकटी एक चिमूट, दोन चमचे मधात कालवून दिवसातून दोन वेळा चाटल्याने टायफाईडपासून बचाव होतो.
घसा बसणे
सर्दी-पडसे यांमुळे घसा बसला असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी पाच-सहा काळी मिरी आणि तेवढेच बत्तासे चावून चावून खा. बत्ताश्यांच्या ऐवजी खडीसाखरही चालेल. हे चावतांना रस गिळत राहिल्यास गळा खुलतो.
चष्म्यापासून मुक्ती
२५० ग्रॅम बदाम, ५० ग्रॅम खसखस आणि १० ग्रॅम काळी मिरी वाटून शुद्ध तुपात भाजून घ्यावे. त्यात १०० ग्रॅम खडीसाखर मिसळून घ्यावी. प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे घेतल्याने नेत्रज्योती वाढते आणि सहा मासांत चष्मा उतरतो.
डोकेदुखी
लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यांत सोडल्याने किंवा चंदन पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
(सूचना : मंदाग्नी आणि मधुमेहाच्या लोकांनी हा उपाय करू नये.)
(डॉक्टरांच्या संमतीविना औषधे घेऊ नयेत.)
औषध सेवन करतांना म्हणायचा मंत्र
शरीरे जर्जरे भूते व्याधिग्रस्ते कलेवरे ।
औषधं जाह्नवीतोयं वैद्यो नारायणो हरिः॥
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, अंक ६)