जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव पुसून टाका ! – प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज
निपाणी – पाकिस्तान हा निर्माण झाल्यापासून आपल्या देशावर सतत कुरघोडी करत आहे. त्याचे हृदय परिवर्तन कधीच होणार नाही. पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकावे लागेल, तरच भारतीय सैनिक सुरक्षित राहू शकतील. आजच्या तरुणांनी केवळ सामाजिक माध्यमांद्वारे पोस्ट टाकण्याएवढेच सिमीत न रहाता प्रत्येक मंडळ, घरांमध्येही सैनिक हुतात्मा झालेल्याचा दुखवटा व्यक्त केला पाहिजे, असे मत दत्त मंदिर तमणाक वाडा येथील प.पू. सद्गुरु सच्चिदानंद महाराज यांनी व्यक्त केले.
श्री विरुपाक्ष लिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली बहिरेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील हुतात्मा सैनिक ऋषिकेश जोंधळे यांच्यासाठी १६ नोव्हेंबर या दिवशी धर्मवीर संभाजीराजे चौक येथे श्रद्धांजली आणि पाकिस्तानचा निषेध कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ‘श्री गुरुकुल करिअर अकॅडमी’चे श्री. चारुदत्त पावले यांच्या विद्यार्थ्यांकडून सलामी देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी ॐ शक्ती मठ शेंडूर येथील श्री श्री श्री अरुणानंदतीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘‘देशाच्या जवानांना सर्व मोकळीक दिली पाहिजे, तसेच त्यांना सवलती दिल्या पाहिजेत. भारत मातेचे रक्षण करतांना सैनिकांनी जे बलीदान दिले त्याची जाणीव कायमस्वरूपी प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. तरुणांनी भारतीय सैन्यात सहभागी होण्याची जिद्द बाळगली पाहिजे.’’
या वेळी ‘हुतात्मा सैनिक अमर रहे’, ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर श्रीखंडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पालिकेचे आयुक्त श्री. महावीर बोरंनवर, निपाणी पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी, सर्वश्री बबन निर्मळे, रवि रेडेकर, निवास पोवार, रामनकट्टी सर, मदणावर सर, पृथ्वीराज मूर्कीभावी, ‘रिक्शा असोसिएशन’चे प्रमुख यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.