अलीगड (उत्तरप्रदेश) येथील श्रीगुरु गोशाळेत बनवल्या जातात शेणापासून पणत्या !

केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील श्रीगुरु गोशाळेमध्ये गायीच्या शेणापासून पणत्या बनवल्या जातात. यामुळे स्थानिक प्रवासी मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास साहाय्य होत आहे. या माध्यमातून नैसर्गिक साधनांचा वापर करत नवनवीन वस्तू बनवण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. यांमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोचत नाही.

छत्तीसगडच्या कोंडागाव येथील रहिवासी अशोक चक्रधारी यांनी २४ ते ४० घंट्यांपर्यंत जळणारा मातीचा दिवा बनवला आहे. चक्रधारी यांनी सांगितले की, यावर्षी नवरात्रीत त्यांना कुणीतरी दूरभाष करून ‘तुम्ही जशी पणती बनवली आहे, तशीच पणती आम्हाला बनवून हवी’, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी बनवलेली पणती पुष्कळ प्रसिद्ध झाली. तेव्हापासून ते प्रतिदिन ५० ते ६० पणत्या बनवत आहेत. या पणत्यांचे मूल्य २०० ते २५० रुपये इतके आहे.