हिंदूंनी सर्वत्र जाऊन हिंदु धर्माची शिकवण आणि मूल्ये यांचा प्रचार करणे आवश्यक ! – मारिया वर्थ, जर्मन लेखिका
भारतातील विविध वृत्तवाहिनींचे निवेदक सामान्यत: खूप हुशार आणि सक्षम असतात; मात्र जेव्हा हिंदु धर्माचा विषय निघतो, तेव्हा त्यांची बुद्धी किंवा धैर्य अल्प पडत असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी ऋषभ गुलाटी यांनी ‘न्यूज एक्स’ वर सांगितले की, कट्टरवादी वहाबी इस्लाममध्ये ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) केलेल्या भारतीय मुसलमानांना मवाळ सुफी पंथात परत कसे आणता येईल, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. ऋषभ गुलाटी यांना नक्कीच जाणून घ्यावे लागेल की, इस्लाममधील सर्व गट कुराणवर आधारलेले आहेत. त्यांना हेही ठाऊक असेल की, ‘इस्लामवर विश्वास ठेवणारे तेवढे चांगले आणि विश्वास न ठेवणारे वाईट’, अशी संपूर्ण विभागणी त्यांच्या ग्रंथामध्येच निश्चित करण्यात आली आहे.
इस्लाम आणि ख्रिस्ती यांपेक्षा हिंदु धर्म कसा लाभदायी आहे, हे पटवून द्यायला हवे !
‘ऋषभ गुलाटी यांनी भारतीय मुसलमानांना त्यांच्या पूर्वीच्या काळच्या हिंदु धर्मामध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न का करू नये ? गेल्या १ सहस्र वर्षांमध्ये स्वत:च्या हिंदु धर्माच्या बाजूने खंभीरपणे उभे रहाणे अतिशय धोकादायक ठरले आहे. या कारणाने बहुतेक हिंदू आपल्या धर्माविषयी मुत्सद्दीपणे वागणे किंवा तडजोड करणे, धर्माचा उल्लेख किंवा त्याची स्तुती टाळणे इत्यादी गोष्टी करतांना दिसतात. सध्या ही वृत्ती त्यांच्यात खोलवर कोरली गेली आहे. या वृत्तीने आजच्या पिढीला पूर्णपणे ग्रासले आहे. इंग्रजी शिक्षणपद्धतीमुळे ही वृत्ती अजून दृढ झाल्यामुळेच स्थिती आणखीन बिघडली आहे.
‘प्राचीन भारतीय परंपरा वस्तूस्थितीला धरून नसल्याने ती कनिष्ठ आहे’, असे खोटे चित्र उभे करण्यात आले आहे. ‘धर्मांतरित झालेल्यांशी व्यवहार करतांना कुठल्याच वादात पडायचे नाही’, अशी पराजित मानसिकता हिंदूंनी स्वत:मध्ये निर्माण केली आहे. ही वृत्ती सध्याच्या काळाला उपयुक्त नाही, तर उलट अधिक धोकादायक आहे. सत्य स्पष्टपणे मांडण्याची हीच वेळ आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती यांपेक्षा हिंदु धर्म कसा लाभदायी आहे, हे पटवून देण्याची वेळ आली आहे. या संधीचा योग्य वापर केला नाही, तर तशी संधी परत मिळणे शक्य नाही.
इस्लाम आणि ख्रिस्ती यांनी हिंदु धर्माची पुष्कळ मोठी हानी करणे
इस्लाम किंवा ख्रिस्ती यांना ‘त्यांच्या धर्माने संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवावे आणि त्यासाठी प्रयत्नरत रहाणे, हे आपले दैवी कर्तव्य आहे’, असे ते मानतात. इस्लाम आणि ख्रिस्ती यांचे सदस्य सर्वत्र जाऊन त्यांच्या धर्माचा प्रचार अन् प्रसार करतात. आपलाच धर्म तेवढा खरा आणि इतरांचा खोटा असा दावा करण्यास ते संकोच करत नाहीत. स्वत:च्या व्यतिरिक्त इतर सर्व पंथ किंवा धर्म नामशेष करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामध्ये ते काही प्रमाणात यशस्वीही झाले आहेत. केवळ भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती या दोन्ही पंथांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. भारतात हिंदु धर्म आजही अबाधित आहे; परंतु त्यांनी हिंदु धर्माची खूप मोठी हानी केली आहे. या दोन्ही पंथांनी आजही हार स्वीकारलेली नाही. त्यांनी कधी नव्हे, एवढे प्रयत्न चालू ठेवले आहेत.
असे असले, तरी हिंदूंच्या बाजूने एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे हिंदु धर्म सत्वर आधारलेला आहे. हिंदु धर्म हाच मानवजातीसाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हिंदूंनी सर्वत्र जाऊन हिंदु धर्माची शिकवण आणि मूल्ये यांचा प्रचार अन् प्रसार करणे, ही काळाची आवश्यकता आहे.’
– मारिया वर्थ, जर्मन लेखिका