हे गुरुमाऊली, समर्पित व्हावे आपुल्या चरणी ।
हे गुरुमाऊली, समर्पित व्हावे आपुल्या चरणी ।
असे वाटे या जिवाला ।
काय समर्पित करू ।
ना कळे, या अज्ञानी जिवाला ॥ १ ॥
सर्वकाही आपलेच आहे ।
मीही आपलीच आहे ।
आपणच दिलेले सर्व समर्पण करायचे आहे ॥ २ ॥
समर्पण म्हणावे कि नाही, तेही कळेना ।
कारण समर्पण करण्याजोगे या जिवाकडे नसे काही ॥ ३ ॥
‘स्व’ अर्पण करून घ्यावा’, हीच प्रार्थना ।
चरणी विलीन करून घ्यावे ।
अन् मायेतून मुक्त करावे, या वेड्या जिवाला ॥ ४ ॥
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक (११.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |