(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्न
मध्यप्रदेश सरकारच्या प्रस्तावित लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध
|
मुंबई – प्रेम केल्यावर तुरुंगात जावे लागेल कि प्रेम करण्यापूर्वी धर्म पहावा लागेल ? घाबरू नका. समाजात द्वेष पसरवणार्यांना आता कुणी रोखणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले जाईल.
‘लव्ह जिहाद’सारख्या एका खोट्या संकल्पनेवर कायदा सिद्ध केला जात आहे. (हे अय्यूब कोणत्या आधारे सांगत आहेत ? – संपादक) वाह सरकार कमाल केलीत तुम्ही, असे ट्वीट अभिनेता झिशान अय्युब यांनी मध्यप्रदेश सरकार करणार असलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी केले आहे.
प्यार करने पर जेल जाना पड़ेगा!!!
या प्यार करने से पहले धर्म देखना पड़ेगा!!!
घबराइए मत, नफ़रत करने पर कोई नहीं टोकेगा, बल्कि तालियाँ बजाईं और बजवाईं जाएँगी!!👏🏼👏🏼👏🏼
#lovejihaad जैसे झूठ पर क़ानून बनाया जा रहा है! वाह साहेब वाह!!! https://t.co/7IgbrGh5vG— Mohd. Zeeshan Ayyub (@Mdzeeshanayyub) November 17, 2020
मध्यप्रदेश सरकार अजामीनपात्र गुन्हा असणारा कायदा आणणार आहे. यात दोषींना ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असणार आहे.