मंदिरांनंतर आता गड, किल्ले यांची दारे उघडली
सिंधुदुर्ग – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक मास बंद असलेले किल्ले आणि दुर्ग चालू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे. कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी उणावली असून पूर्णतः टळलेली नाही. दुर्ग आणि किल्ले सर्वांसाठी खुले करण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी जातांना नागरिक आणि पर्यटक यांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.