गोव्यात कोरोनामुळे दिवसभरात ४ मृत्यू, तर १५४ नवीन कोरोनाबाधित
पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ सहस्र ६६० चाचण्या करण्यात आल्या, त्यात नवीन १५४ कोरोनाबाधित आढळले आहेत.
दिवसभरात १९१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची संख्या १ सहस्र्र ३८३ झाली आहे. आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित आणि बरे झालेले रुग्ण यांचे प्रमाण ९५.५६ टक्के आहे. ४ मृतांपैकी एकाला मडगाव येथील हॉस्पिसियो रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हाच तो मृत होता. त्याची कोरोनाशी संबंधित चाचणी केली असता तो कोरोनाबाधित आढळला. रुग्णाच्या कुटुंबियांनी त्या रुग्णात कोरोनाशी संबंधित कोणतीही लक्षणे नव्हती. त्याची पूर्वीही कोरोनाशी संबंधित चाचणी झाली नव्हती, असे सांगितले.