जे.एन्.यू.ला ‘स्वामी विवेकानंद विश्वविद्यालय’ असे नाव द्या !
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांची केंद्र सरकारकडे मागणी
अशी मागणी का करावी लागते ? केंद्र सरकारने थेट नाव पालटून ते घोषित केले पाहिजे ! हिंदुद्वेषी नेहरू यांचे नाव असलेल्या सर्वच संस्थांची नावे पालटून त्यांना हिंदूंच्या संतांची नावे देण्यात यावीत. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
नवी देहली – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि कर्नाटकातील माजी मंत्री सी.टी. रवि यांनी देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे (जे.एन्.यू.चे) नाव पालटून ‘स्वामी विवेकानंद विश्वविद्यालय’ ठेवण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी या विश्वविद्यायात स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे अनावरण केले होते.
BJP neta demands renaming JNU after Swami Vivekananda; says ‘it will inspire generations’ https://t.co/WS71V9A6Mg
— Republic (@republic) November 17, 2020
सी.टी. रवि यांनी म्हटले की, स्वामी विवेकानंद यांचे नाव ठेवल्याने देशातील युवा पिढीला त्यांच्या सारखे संत आणि महापुरुष यांच्या जीवनातून प्रेरणा मिळेल.