सिंधुदुर्गात गत २४ घंट्यांत कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू
सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात ७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र ७७ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९५ आहे. जिल्ह्यात सध्या १४३ रुग्णांवर उपचार चालू आहेत. जिल्ह्यातील ६ कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेले आहेत. २ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३३ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.