श्री गुरुचरणी आता एकच मागणे आहे ।
साधकांचे जीवन आनंदमय करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांंच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी भावसोहळा झाल्यावर सुचलेली कविता !
आज मी गुरुब्रह्म पाहिले ।
आम्हा अजाण लेकरांना ज्ञानामृत पाजण्या ।
भूवरी अवतरले ‘जयंत’ नामे विष्णुरूपी गुरुब्रह्म ॥ १ ॥
सत्संग घेऊनी आम्हा दाखवली खर्या जीवनाची वाट ।
अहं निर्मूलनाच्या प्रक्रियेने मिळाला आम्हा
जीवनाचा मार्ग ॥ २ ॥
या घनघोर आपत्काळात घरबसल्या गुरुदेवांनी दिली ।
आनंदी जीवन जगण्याची व्यष्टी अन् समष्टीची शिदोरी ॥ ३ ॥
ही शिदोरी घेऊन आपण जनसागरात जाऊया ।
गुरुकार्याची महती सांगून त्यांना
हिंदु राष्ट्राचे सेवक घडवूया ॥ ४ ॥
आता श्री गुरुचरणी एकच मागणे आहे ।
साधकांना राष्ट्र-धर्म रक्षणासाठी शक्ती अन् बळ द्यावे ॥ ५॥
– आपला चरणसेवक,
श्री. चंद्रशेखर ज. शिरगावकर, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग. (१३.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |