शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा ! – लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

वर्ष १९०८ मध्ये लोकमान्य टिळक नाशिक येथे गेले होते. तेव्हा तेथे ‘राममूर्ती सर्कस’चे खेळ चालू होते. एका खेळाला लोकमान्य टिळक निमंत्रणावरून गेले. प्रा. राममूर्तींनी लोकमान्यांचा सत्कार केला. आभार मानतांना टिळक म्हणाले, ‘‘आताच प्रा. राममूर्तींचा उल्लेख ‘इंडियन सँडो’ असा केलेला तुम्ही ऐकलात. (‘सँडो’ नावाचा युरोपातील एक मल्ल त्या काळी प्रसिद्ध होता. – संकलक) हिंदभूमीत भीम, भीष्म आदी शक्तीपुरुष बरेच झाले असूनही आपल्या आजच्या शक्तीसंपन्न पुरुषाला शक्तीदर्शक परकीय नाव आम्ही उगीच का द्यावं ? आपण राममूर्तींना ‘आधुनिक भीम’ असे म्हणूया. पाहिजे तर सँडोला ‘युरोपीय भीम’ म्हणा; पण राममूर्तींना ‘इंडियन सँडो’ म्हणू नका. शक्तीपेक्षाही स्वाभिमान महत्त्वाचा आहे !’’

– ह.त्र्यं. देसाई (‘गुणसागर टिळक’)

स्वाभिमान वाढवण्यासाठी स्वभाषाभिमान आणि स्वदेशी वस्तूंचा अभिमान वाढवा