एमआयएमचे घातक मनसुबे !
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एम्आयएम् पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला; पण या विजयाचा त्यांना झालेला आसुरी आनंद लपून राहिलेला नाही. अखेर तो व्यक्त झालाच. खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ आणि एम्आयएम् पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘बिहारमधील निवडणुकीत एम्आयएम् पक्षाला मिळालेले यश म्हणजे भारताच्या राजकारणात नवी तारीख लिहील आणि संपूर्ण जग पाहील की, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ पक्ष संपूर्ण भारतात आपला झेंडा फडकावत आहे’, असे ते म्हणाले. हिंदूबहुल भारतात मुसलमान पक्षाचा एक नेता उघडपणे त्यांचा झेंडा देशावर फडकावण्याची भाषा करतो, हे धक्कादायक तर आहेच; पण भारतीय लोकशाहीला मोठा धक्का देणारेही आहे. असे वक्तव्य करायला अकबरुद्दीन ओवैसी पाकिस्तानात नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. ओवैसी यांना हे भाषण स्वातंत्र्य वाटते कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटते ? त्यांच्या विधानातूनच राजकारणात उतरण्यामागील एम्आयएम् पक्षाचा कुटील हेतू लक्षात येतो. अर्थात् धर्मनिरपेक्ष भारतात याहून वेगळे काय घडणार म्हणा ! निधर्मीतेच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना आतापर्यंत अतिरेकी सवलती देण्यात आल्या. त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल.
भारत देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असतांना बॅ. जीना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची हट्टी मागणी केल्याने फाळणी झाली आणि दोन देश अस्तित्वात आले. ‘हा जहाल इतिहास पहाता अकबरुद्दीन ओवैसी यांचे विधान म्हणजे जीना यांचीच पुनरावृत्ती आहे’, असे एखाद्या भारतियाने म्हटल्यास काय चुकले ? ओवैसी आणि त्यांचा पक्ष लोकशाहीच्या आडून एक प्रकारे धर्मांधता वाढवत आहे. भारतीय लोकशाहीच्या जणू चिंधड्याच उडवत आहे. हे देशासाठी दिवसेंदिवस चिंताजनक आणि अधिक धोकादायक आहे.
‘संपूर्ण भारतात एम्आयएम् पक्षाचा झेंडा फडकणे’, ही कल्पना जरी कुणी केली, तरी खर्या भारतियांचे रक्त सळसळेल. राष्ट्रप्रेमींनो, हे आपल्याला कदापि घडू द्यायचे नाही. एम्आयएम् पक्षाची विचारसरणी राष्ट्रद्वेषी असून समूळ विनाशावर आधारलेली आहे. त्यामुळे राजकारणात शिरून मुसलमानांचे हित साधण्याचा आव आणणार्या एमआयएमचे खरे स्वरूप आता उघड होत आहे. गलिच्छ राजकारण करून देश तोडण्याचे त्यांचे घातक मनसुबे राष्ट्रप्रेमींनी संघटित होऊन उधळून लावायला हवेत. इस्लामी राजवट आणू पहाणारा एम्आयएम् पक्ष काही नवीन नाही; कारण आतापर्यंत असंख्य हिरव्या संकटांनी भारतभूमीचे लचके तोडलेले आहेत. असे जरी असले, तरी आणखी किती काळ हे सर्व सहन करायचे ? एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !