दिवाळीला पहाटे फटाके फोडण्याला काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांचा आक्षेप !

  • ‘वर्षातील २-३ दिवस फटाके फोडल्यावर त्याचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍यांना  स्वत:च्या अजानचा दिवसातून ५ वेळा असा वर्षांतील प्रत्येक दिवस त्रास सहन करणार्‍यांविषयी सहानुभूती का वाटत नाही ?
  • दिवाळीच्या फटाक्यांचा त्रास होत असणार्‍यांनी आता भारत सोडून निघून गेलेलेच योग्य ठरेल !

नवी देहली – काँग्रेसचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांनी दिवाळीच्या दिवशी पहाटे फटाके फोडण्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले, ‘पहाटे ४ वाजता कोणत्या प्रकारचे लोक फटाके फोडतात ? जर निर्णय योग्यरित्या लागू केला जात नाही, तर फटाक्यांवर बंदी घालून काय उपयोग ?’, असे प्रश्‍न त्यांनी विचारले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, देहली यापूर्वीच विषारी नरक बनली होती आणि आता दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी मोठ्या संख्येने लोकांच्या मृत्यूचा सापळा बनणार.

१. सिद्दीकी यांच्या या ट्वीटचा सामाजिक माध्यमांतून अनेकांनी विरोध केला. यात त्यांनी म्हटले की, सकाळी सकाळी अजानचा आवाज येतो, त्यामुळे अनेकांची तंद्री भंग होत नाही का ?

२. आदित्य भारद्वाज नावाच्या व्यक्तीने विचारले, ‘असे कोण लोक आहेत जे ‘धर्मनिरेपक्ष’ भारताच्या नावाखाली अजानद्वारे लोकांना दिवसांतून अनेकदा त्रास देत आहेत ?’