हिंदूंच्या धर्मशिक्षणाविषयीचे अज्ञान दर्शवणार्‍या कृती

आज धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूंच्या जीवनाला ताळतंत्र राहिलेले नाही. धर्माचा पाया नसल्याने त्यांचे जीवन आधारहीन झालेले आहे. धर्मशिक्षणाअभावी भरकटलेल्या हिंदु समाजाकडून होणार्‍या अयोग्य प्रकारच्या कृती पुढे दिल्या आहेत. सर्वत्रच्या हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे यातून लक्षात येईल !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मशास्त्रबाह्य कृती करतात आणि आपण पुरो(अधो)गामी असल्याचे दाखवतात !

बैतूल (मध्यप्रदेश) जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी अग्नीला नव्हे, तर राज्यघटनेला साक्षी राहून सुरेश अग्रवाल यांच्याशी बँकॉक येथे विवाह केला. निशा बांगरे म्हणाल्या की, भारतीय राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे. विविधेत एकतेचा संदेश आणि सर्वांना समानतेचा संदेश राज्यघटनेने दिला आहे.’

कुठे स्त्रियांना सलवार परिधान करायला लावणारे अमरनाथ नियामक मंडळ, तर कुठे भीषण उन्हाळ्यातही भरवस्त्रातील स्त्रियांना बुरखा घालायला सांगून धर्माचरण करायला लावणारे धर्मांध !

‘काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणी करण्यास प्रारंभ झाला आहे. या यात्रेकरिता अमरनाथ नियामक मंडळाने महिलांना साडी परिधान करण्याऐवजी सलवार, पँट-शर्ट अथवा ट्रॅक सूट असे पर्याय सुचवले आहेत. ‘पर्वतांमधील प्रवासामध्ये साडीपेक्षा अन्य कपडे अधिक सुलभ ठरतील’, असे म्हटले जात आहे.’

धर्मशिक्षणाअभावी सणासुदीच्या दिवशी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या हिंदु स्त्रिया !

‘वर्ष २०१४ मध्ये सकाळी गुढीपूजनासाठी आम्ही अंगणात आलो. त्या वेळी आजूबाजूलाही गुढीपूजन चालू होते. तेव्हा समोरच्या घरातील स्त्रियांनी ‘गाऊन’ (लांब झगा) घातला होता. केस धुऊन ते न विंचरता मोकळे सोडून त्या हातात पूजेचे तबक घेऊन पूजेसाठी उभ्या होत्या. आजूबाजूलाही असेच चित्र पहायला मिळाले. ते पाहून मला आश्‍चर्य वाटले. मी सासूबाईंना याविषयी विचारल्यावर ‘त्या तशीच पूजा करतात’, असे त्यांनी सांगितले. – सौ. श्रद्धा

(‘हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते सणाच्या दिवशी हिंदु संस्कृतीत सांगितल्यानुसार सात्त्विक कपडे घालण्याऐवजी ‘गाऊन’ घालून आणि केस बांधण्याऐवजी ते मोकळे सोडून पाश्‍चात्त्यांसारखे वागतात. स्त्रीने धर्माचरण केल्यास ती कुटुंबावरही चांगले संस्कार करते. वरील उदाहरणावरून धर्माचरणाची अनिवार्यता लक्षात येते.’ – संकलक)

रमझानमध्ये मुसलमान बंदीवानांसमवेत रोजे पाळून काही काळासाठी धर्मांतरित होणारे हिंदु बंदीवान !

‘नवी देहली येथील तिहार कारागृहातील २ सहस्र ३०० मुसलमान बंदीवानांसमवेत १५० हिंदु बंदीवान, तसेच ७० महिला बंदीवानही रमझानमध्ये रोजा धरणार आहेत, अशी माहिती तिहार कारागृहाच्या अधिकार्‍याने दिली होती.’

जुगाराच्या पैशांतून देवाचा उत्सव साजरा करणे अयोग्य !

‘जुगारातून मिळणार्‍या पैशांतून जत्रा, उत्सव साजरे करायला मिळतात, असा अपसमज मंदिर समितीवाल्यांनी करून घेतला आहे. देवाला भावपूर्ण प्रार्थना केल्यास उत्सवासाठी देव काही न्यून पडू देणार नाही.’ – श्री. प्रशांत चणेकर, हिंदु जनजागृती समिती, गोवा.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून इस्लाम धर्म स्वीकारतात !

‘मुंबईतील फिरोज मोईद्दीन (वय २१ वर्षे) याने अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिने त्याच्याशी विवाह करून इस्लाम धर्म स्वीकारला. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी फिरोजच्या वडिलांना १० दिवस पोलीस कोठडीत ठेवले. हे समजताच फरहा फिरोज असे नाव असलेली ती मुलगी न्यायालयात येऊन म्हणाली, ‘‘मला १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आम्ही न्यायालयात विवाह केला आहेे. मी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याने हे प्रकरण आता बंद करा.’’ (धर्माचरणामुळे मुलींची अंतर्मुखता आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत रहाते. धर्मांधाकडून केल्या जाणार्‍या अघोरी उपायांपासून तिचे संरक्षण होते. त्यामुळे लव्ह जिहादसारख्या संकटांपासून ती वाचू शकते. – संपादक)