धर्माचरणामुळेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल !
‘स्वामी विवेकानंद यांनी ‘सामर्थ्य’ या एका शब्दात हिंदु धर्माचे वैशिष्ट्य सांगितले आहे. धर्माचरण केल्यानेच हिंदूंना सामर्थ्य प्राप्त होईल. आपले पूर्वज पराक्रमी होते; कारण ते धर्माचरण करत होते. सध्या हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते धर्माचरण करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये धर्माविषयीचा स्वाभिमान नाही. त्यामुळे हिंदु धर्माची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्माभिमान नसल्यामुळेच हिंदु युवतींना कुंकू लावायला लाज वाटते. हिंदू देशाचे मालक असूनही त्यांना दास्यत्वाचे जीवन जगावे लागत आहे. हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदूंना व्यासपीठ नाही. मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मांतरित होत आहेत. ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर होय’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करायला हवे.’ – एक धर्मप्रेमी