धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार
• ‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’
• राष्ट्ररचना करू इच्छिणारे नेते आणि त्यांचे अनुयायी यांमध्ये नैतिक (आध्यात्मिक) प्रेरणा असणे आवश्यक आहे. धर्माचरणी हिंदूंमध्येच खरीखुरी नैतिक प्रेरणा जागृत होत असल्याने ते हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे प्रत्यक्ष कार्य करू शकतात.
• ‘ख्रिस्ती मुसलमानांच्या घरी जाऊन ख्रिस्ती धर्माचे महत्त्व सांगण्यास धजत नाहीत; मात्र हिंदूंच्या घरी येतात. असे का, याचा हिंदूंनी विचार करावा.’
• ‘बहुतांशी अन्य पंथीय पैशांची लालूच दाखवून, कपटाने किंवा बळजोरीने हिंदूंना आपल्या पंथात ओढतात; मात्र हिंदु धर्मात सांगितलेल्या साधनेचे महत्त्व कळल्यावर सुजाण अन्य पंथीय हिंदु धर्माचे पालन करतात.’
मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेलेला असणे आणि यावरचा एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !
‘साधना न शिकवल्याने मुले नीतीवान न होता मोठी झाल्यावर बलात्कार, भ्रष्टाचार, गुंडगिरी करतात. मग बलात्कार करणार्यांना रोखण्यासाठी पोलीस लागतात. सध्याचे पोलीसही भ्रष्टाचारी असतात. भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचारी पोलीस यांना रोखण्यासाठी सरकारी अधिकारी लागतात. तेही भ्रष्टाचारी असतात. या सर्वांमुळेच कलियुग टोकाला जाते. हे सर्व होऊ नये; म्हणून गुन्ह्यांच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपाय केले पाहिजेत, म्हणजेच साधना शिकवली पाहिजे; पण आज हे कुणालाच कळत नाही. त्यामुळे देश पराकोटीच्या रसातळाला गेला आहे. यावर केवळ एकमात्र उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करून सर्वांना साधना शिकवणे !’
हिंदूंनी प्रतिदिन मार खाण्याचे कारण
‘धर्मासाठी अन्य धर्मीय एक होतात, तर संकुचित वृत्तीचे हिंदू जातीसाठी एक होऊन अन्य जातीतील स्वधर्मियांशी भांडतात; म्हणून हिंदू प्रतिदिन मार खातात. यावरील उपाय म्हणजे हिंदूंना साधना शिकवून त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे !’
‘सुखासाठीच्या सर्व गोष्टी शिकवणारे आई-वडील आणि प्रशासन मुलांना चांगले अन् सात्त्विक काहीच शिकवत नाहीत. त्यामुळे देश दुर्दशेच्या परिसीमेला पोचला आहे. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ |