संवेदनशील पत्रकाराच्या मर्यादा अर्थात् दुःख आणि साहित्यिकांची स्थिती !
‘संवेदनशील पत्रकाराचे म्हणून एक वेगळे आणि फार खोल आशय असलेले दुःख असते. दैनंदिन धबडग्यात अनेक घटना आणि माणसे यांचा न्याय करण्याची कामगिरी त्यांच्यावर येऊन पडते; पण तो न्याय देऊ शकतोच, असे नाही. विविध प्रकारच्या सार्वजनिक चलनवलनाचे सूत्रधार दोर्या ओढतील, त्याप्रमाणे माणसाची आणि घटनेची बरी-वाईट बाजू प्रकाशात येते. दुसरी बाजू बघण्यासाठी हालचाल करण्याची संधी पत्रकाराला मिळतेच, असे नाही आणि जरी मिळाली, तरी पुरेशी साधने नसतात. असली तरी वापरण्याची शक्ती नसते. सुदैवाने शक्ती असली, तरी तिचा उपयोग करण्यासाठी जी इच्छा लागते, तिच विविध आघातांनी पंगू झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती आणि घटना यांचे वास्तविक प्रगटीकरण होत नाही. त्यांच्यावरील अन्यायाला व्यक्त होण्यापुरता जरी शब्दांंचा आधार सापडला, तरी काही अनिष्ट सामाजिक प्रवाह आणि त्या संबंधीचा इतिहास लोकांसमोर चमकून वातावरणातील साफसफाईला बळ मिळू शकते. असे जेव्हा होत नाही, तेव्हा संवेदनशील पत्रकाराला मनस्वी दुःख होते आणि ते ठणकत राहते.
१. इस्लामचा वैचारिक आणि साहित्यिक आतंकवाद !
क्रौर्य आणि अमानुष इस्लामी मानसिकतेशी कसे पुरुषार्थाने वागावे, याचे कठोर प्रशिक्षण म्हणजे नवी राजकीय दृष्टी प्रत्येक हिंदूला दिल्यावाचून भारतावर हिंदूंचे प्रभुत्व रहाणार नाही.
२. ‘स्वतंत्रपणे विचार करणे म्हणजे पाप’, अशी भीती कॅथॉलिक धर्ममताने विचारवंतांमध्ये निर्माण करणे
मध्ययुगीन इंग्लंडमध्ये आणि एकंदर युरोपमध्ये सकस साहित्याची निर्मिती झाली नाही. याचे कारण ‘त्या वेळी तेथे प्रबळ सत्ता बनलेले कॅथॉलिक धर्ममत समाजजीवन पूर्णतः नियंत्रित करत होते’, असे जॉर्ज ऑरवेलने म्हटले आहे. प्रोटेस्टंट मत मांडले जाऊ लागले, त्यानंतरच्या शतकात श्रेष्ठ प्रतीचे वाङ्मय निर्माण होऊ लागले. स्वतंत्रपणे आणि वेगळ्या वाटेने जाऊन विचार करणे, म्हणजे पाप असल्याची भीती कॅथॉलिक धर्ममताने विचारवंतात निर्माण केली होती.
३. स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय साहित्यिकांनी भारतियांचा केलेला विश्वासघात !
पाच सहस्र वर्षांत हिंदू कधी झाले नाहीत, एवढे उद्ध्वस्त वर्ष १९४७ मध्ये झाले. पूर्वीचे आक्रमक परके आणि अहिंदू होते. या वेळी आम्ही उद्ध्वस्त झालो, ते आमच्या स्वदेशी हिंदु नेत्यांच्या विश्वासघाताने. तरीही त्याविरुद्ध चकार शब्द काढण्याचे स्वातंत्र्य हिंदूंना नाही. हे जे अघटित घडले, त्याचा ओरखडाही आमच्या साहित्यिकांच्या काळजावर उमटलेला नाही, असे गेल्या ५० वर्षांतील वैचारिक आणि ललित भारतीय साहित्य वाचून वाटते. भारतीय समाजाने प्रचंड आत्मवंचना करून हे साहित्य जन्मास घातले आहे. इतके स्वतःला नाकारणारे खोटे साहित्य जगाच्या पाठीवर कुठे मिळण्याची शक्यता नाही.
४. धार्मिक विधी ईश्वरप्राप्तीसाठी असतात, याचा विसर पडलेले अज्ञानी हिंदू !
असा एक धार्मिक विधी हिंदूना अनिवार्य केला पाहिजे की, जो त्यांना प्रतिदिनी स्नानोत्तर करावाच लागेल आणि ज्यातून गमावलेला भूभाग अन् माणसे यांची आठवण होईल, असे काहींनी सुचवले आहे.
५. प्रत्येक हिंदूला दुसर्या हिंदूची व्यथा स्वतःची वाटायला हवी !
रात्र वैर्याची आहे. प्रत्येक हिंदूला दुसर्या हिंदूची कथा आणि व्यथा आपलीच वाटली पाहिजे अन् सर्वांनी मिळून मार्ग काढण्यासाठी झटले पाहिजे.’
(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, मार्च २०००)