निरोगी जीवनाचा कानमंत्र
‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’
असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे. भवरोगावर ब्रह्मज्ञान हे औषध आहे, तर वाचेने भगवंताचे नाव घेणे, हे पथ्य आहे. यासाठीच रोग्याने गुरु आणि ईश्वर या वैद्यांनाच नेहमी शरण जावे !