उपवासाच्या दिवशी काय करावे ?

१. प्रातःकाळी करायच्या गोष्टी

अ. ‘नेहमीपेक्षा लवकर उठावे.

आ. आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे.

इ. शौच, व्यायाम, स्नान यानंतर नामजप करावा.

२. संकल्प

‘ईश्वरभक्तीत पूर्ण समर्पित होऊन उपवास करीन आणि त्याच्या सहवासात राहीन’, असा संकल्प करावा.

३. आहार

अ. रजोगुणी अन् तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

आ. पचायला हलका, पौष्टिक आणि सात्त्विक आहार घ्यावा.

इ. शक्य असल्यास रसाळ मधुर फळे आणि दूध घ्यावे.

४. अन्य सूत्रे

अ. काम, क्रोध, मद आणि लोभ या मनोविकारांना दूर ठेवावे. कुणालाही शारीरिक आणि मानसिक कष्ट न देता आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा.

आ. काही घंटे वाचिक (तोंडाने) आणि मानसिक स्तरावर मौन पाळावे.

५. सायंकाळी इष्टदेवाचे दर्शन घ्यावे.

६. रात्री झोपण्यापूर्वी काय करावे ?

अ. इष्टदेवाचे चिंतन करावे.

आ. दिवसभरातील चुकांचे आत्मपरीक्षण करावे.’