समाजाची सात्त्विकता वाढवणार्या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !
कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे. संस्थेच्या उपक्रमांसाठी आवश्यक अशा विविध कलाकृती (उदा. ग्रंथांची मुखचित्रे, पंचांग, फलक, हस्तपत्रके, ‘सीडी कव्हर’, छायाचित्रांचे संच तयार करणे, सूक्ष्म-चित्रे, बोधचित्रे, विज्ञापने आदी) बनवण्याची सेवा सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमात करण्यात येते. या कलाकृती बनवण्यासाठी ‘कोरल ड्रॉ’ आणि ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असलेल्या साधकांची तातडीने आवश्यकता आहे. वरीलपैकी कोणत्याही संगणकीय प्रणालीचे ज्ञान आणि रामनाथी येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा. ज्यांना या प्रणाली शिकून घेऊन सेवा करण्याची इच्छा आहे, असे आणि घरी राहून व्यावसायिक विज्ञापने करू शकणारे साधकही संपर्क करू शकतात. कोरोनाचा संसर्ग अल्प झाल्यानंतर इच्छुक साधकांना आश्रमात बोलावण्याचे नियोजन करण्यात येईल.
वरील सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी स्वतः बनवलेली एखादी कोणत्याही विषयावरची कलाकृती (आर्टवर्क) इ-मेलद्वारे पाठवून द्यावी.
आश्रमात राहून पंचांगाची निर्मिती करण्यासाठी पंचांगाचा अभ्यास असलेल्या साधकांची तसेच मराठी भाषेचे चांगले ज्ञान आणि संकलनाचा अनुभव असलेल्या साधकांचीही आवश्यकता आहे. सनातनची उत्पादने आणि प्रसारसाहित्य यांचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हासेवकांनीही आपल्या जिल्ह्यातील, विशेषतः तरुण साधक-साधिकांपैकी वरील सेवा कोण करू शकतील, याचा विचार करून त्या साधक-साधिकांच्या अनुमतीने त्यांचीही नावे कळवावीत.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com