कोरोनामुक्त झालेल्यांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन
पणजी – ‘प्लाझ्मा’ थेरपीमुळे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आता केवळ १४ ‘प्लाझ्मा’ शिल्लक आहेत. कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांनी ‘प्लाझ्मा’ दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले आहे.