आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
उत्तरप्रदेश राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिदिन धिंडवडे काढणार्या घटना ! भाजपच्या राज्यात असे होणे अपेक्षित नाही, असेच हिंदूंना वाटते !
आझमगड (उत्तरप्रदेश) – आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्यावर घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी ‘येथे नवीन मूर्ती स्थापन करण्यासह धर्मांधांवर कारवाई करू’, असे आश्वासन दिले. पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Tension in UP village after Lord Shiva Idol found vandalised by unknown miscreants during Shravan Melahttps://t.co/6X7WxH3v9M
— OpIndia.com (@OpIndia_com) August 8, 2020
या मंदिरात कुणीही पुजारी नाही. गावकरीच या मंदिराची देखभाल करतात. रात्री हे मंदिर कुलूप लावून बंद केले जाते; मात्र सध्या श्रावण मास चालू असल्याने कुलूप लावण्यात येत नव्हते. त्याचाच अपलाभ उठवत अज्ञातांनी मूर्तीची तोडफोड केली.