गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील २३ डॉक्टर कोरोनाबाधित
पणजी – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २३ डॉक्टर आणि १३ परिचारिका कोरोनाबाधित झाले आहेत. मडगाव येथील कोरोना रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापेक्षा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अधिक आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ३ निराळे विभाग सिद्ध केलेले असले, तरी महाविद्यालयातील इतर विभागांतही कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. सर्जरी, न्यूरोसर्जरी, प्रसुती, मेडिसीन, अतीदक्षता विभाग, त्वचा विभाग, डायलिसिस, नाक-कान-घसा विभाग, नेत्र विभाग, बाल रुग्ण विभाग आणि कर्करोग विभाग यांमध्येही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.