‘स्वतःच्या चल आणि अचल संपत्तीचे ‘सत्पात्रे दान’ व्हावे’, या हेतूने ती सनातन संस्थेला दान करण्यास इच्छुक असल्यास आपल्या हयातीत अर्पण करा !
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘गेल्या अनेक वर्षांपासून सनातन संस्था निःस्वार्थीपणे आणि निरपेक्षपणे धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. भारतभरातील विविध ठिकाणचे साधक धर्मप्रसाराचे कार्य अविरतपणे करत असून या कार्यात अनेक वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी जोडले गेले आहेत. सनातन संस्थेचे कार्य पाहून समाजातील अनेक जण संस्थेला विविध स्वरूपांत अर्पण देतात. बरेच जण स्वतःची चल (धन, सोने, वाहने इत्यादी) आणि अचल (घर, ‘फार्म हाऊस’, दुकान, मोकळी जागा (प्लॉट), शेतभूमी आदी) संपत्ती सनातन संस्थेला देण्याची इच्छा व्यक्त करतात.
मृत्यूपत्र करून आपली संपत्ती एखाद्याच्या नावावर करण्यापेक्षा हयातीत संपत्ती अर्पण करणे अधिक सोयीचे आहे. याचे कारण म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे तिने सत’च्या कार्याला देऊ केलेली संपत्ती सनातन संस्थेला मिळण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. हे टाळण्यासाठी इच्छुकांनी हयातीतच स्वेच्छेनुसार आपल्या संपत्तीचा विनियोग करावा. असे केल्याने ही क्लिष्ट प्रक्रिया टाळता येईल आणि ‘सत्पात्रे दान’ केल्याचे समाधानही लाभेल.
स्वतःची चल आणि अचल संपत्ती आपल्या हयातीत सनातन संस्थेला अर्पण करण्यास इच्छुक असलेल्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क करावा अथवा संगणकीय पत्त्यावर स्वतःची माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक : श्री. वीरेंद्र मराठे – ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
टपालासाठी पत्ता : श्री. वीरेंद्र मराठे, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (९.७.२०२०)