पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या वतीने आरोग्योत्सवास प्रारंभ
पुणे – शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्य पुण्यातील २७२ गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. जय गणेश व्यासपिठाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य सेवेला आरंभ केला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि होम आयसोलेशन यांसाठी प्रशासनाला माहिती देण्यात साहाय्य होणार आहे. बुधवार पेठेतील कोतवाल चावडी येथे हे कोव्हिड साहाय्यता केंद्र चालू करण्यात आले असून याचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले.