सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा बसवण्यात यावी ! – मनसेची मागणी

मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर

कणकवली – जागतिक आरोग्य संस्था आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी मान्यता दिलेले ‘एन्टीजेन’ तपासणी किट यंत्रणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमांवर बसवावी, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी येणार्‍या गणेशभक्तांसाठी ही चाचणी विनामूल्य करण्यात यावी किंवा ५० ते ७० टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी. या यंत्रणेद्वारे १५ ते ३० मिनिटांत अहवाल प्राप्त होत असल्याने प्रशासनावरील ताण अल्प होणार आहे. ही यंत्रणा बसवण्यासाठीचा खर्च शासनाकडून प्राप्त झालेल्या कोरोनासाठीच्या निधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात यावा.’