ठाणे कारागृहातील कर्मचार्याला कोरोनाची लागण
ठाणे, २२ जून (वार्ता.) – येथील मध्यवर्ती कारागृहात २३ मे या दिवशी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १ मासाने येथील एका कर्मचार्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील इतर अधिकारी आणि कर्मचारी यांचीही चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी दिली. कारागृहातील बंदीवान आणि कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी कारागृह प्रशासनाकडून हेळसांड केली जात असल्याचा आरोप होत आहे. याविषयी कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणभाष उचलला नाही.