राजगुरुनगर नगरपरिषद भ्रष्टाचारप्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद

विविध करांचे अनुमाने ७७ लाख रुपये कर्मचार्‍यांनीच हडपले

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

राजगुरुनगर (जिल्हा पुणे) – नगरपरिषदेतील कर्मचार्‍यांनी विविध करांपोटी जमा झालेल्या रकमेपैकी अनुमाने ७७ लाख रुपये ‘चलन’ न करता संगनमताने डल्ला मारून ते हडपल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते. या प्रकरणी अमर मारणे, सुनील भालेराव, आशा पोखरकर, गणेश देवरकर, महेश घुमटकर आणि काळूराम नाइकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी युवराज विरणक यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

३१ मार्च २०१८ ते ३१ मार्च २०१९ या काळात अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही कर्मचार्‍यांनी अपहृत रकमेपैकी ३७ लाख रुपये नगरपरिषदेच्या खात्यावर जमा केले. उर्वरित ३९ लाख ७ सहस्र ३२५ रुपये त्यांच्याकडून येणे आहे. मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दोषींवर कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोपही होत आहे.