आंध्रप्रदेशात ख्रिस्त्यांची कागदोपत्री लोकसंख्या केवळ २.५ टक्केच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे !
आंध्रप्रदेशचे सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघु रामकृष्ण राजू यांचा गौप्यस्फोट !
- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे स्वतःच कट्टरतावादी ख्रिस्ती आहेत. त्यामुळे राज्यात ख्रिस्त्यांची खरी लोकसंख्या किती आहे ? आणि ती किती प्रमाणात वाढत आहे ?, हे कळणेच कठीण आहे !
- ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे बलपूर्वक, प्रलोभन दाखवून आदी मार्गांनी केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन स्वतःतील धर्माभिमान वाढवणे, तर हिंदुत्वनिष्ठांनी या अन्यायाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक आहे !
- असेच चालू राहिले, तर लवकरच या हिंदुबहुल देशात हिंदू अल्पसंख्य होतील ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्रच हवे !
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशात सरकारी आकडेवारीनुसार ख्रिस्त्यांची लोकसंख्या केवळ २.५ टक्के इतकीच असली, तरी प्रत्यक्षात ती २५ टक्के आहे, असा गौप्यस्फोट राज्यातील सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे खासदार रघु रामकृष्णा राजू यांनी केला. ते टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यापूर्वी त्यांनी जर मिशनरी पैशांच्या जोरावर हिंदूंचे धर्मांतर करत आहेत, तर मी काय करू, असे अत्यंत दायित्वशून्य विधान केले होते. आता त्यांनी वरील माहिती दिली आहे.
मागासवर्गीय हिंदू धर्मांतर करतात; मात्र नोंदणी करत नाहीत !
- असा प्रकार देशातील अनेक राज्यांतही होत असणार. याचाच अर्थ देशात ख्रिस्ती २.५ टक्के असले, तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असणार ! याचा केंद्र सरकारने शोध घेऊन संबंधितांवर कारवाई केली पाहिजे !
- हे चित्र पालटण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे !
राजू म्हणाले की, मला ठाऊक नाही की, हे चांगले आहे कि वाईट; मात्र मी जी माहिती देत आहे ती केवळ आकडेवारीनुसार आहे. आंध्रप्रदेशातील काही लोक मागासवर्गियांमधील आहेत. त्यांना आरक्षण आणि अन्य सरकारी सुविध यांचा लाभ मिळत आहे. जर त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर त्यांना या सुविधा मिळणे बंद होते. यामुळेच लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारतात; मात्र त्याची नोंदणी करत नाहीत. अशांमुळेच राज्यात ख्रिस्त्यांची लोकसंख्या २५ टक्के आहे.
याविषयी राजू यांनी राज्यघटनेच्या कलम २५ (१)चा उल्लेख केला, तसेच मी ख्रिस्ती धर्माच्या विरोधात नाही. मी प्रत्येक धर्माचा आदर करतो, असेही स्पष्ट केले.