पर्यावरणास आणि आरोग्यास अत्यंत हानीकारक चिनी उत्पादने !
‘चिनी उत्पादने अत्यंत खालच्या प्रतीची, अल्प टिकाऊ आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशा रसायनांनी युक्त आहेत, उदा. खेळण्यांमध्ये ‘शिसे’, फटाक्यांमध्ये ‘सल्फर’, अन्नपदार्थांमध्ये ‘मेलामाइन’, कपड्यांत ‘फारमेल्डीहाईड’, चादरीत ‘फ्लुरोसेंट’ किंवा ‘मेथानॉल’, दंतमंजनात ‘डाईग्लाईकॉल’ इत्यादी. ही उत्पादने पर्यावरण प्रदूषणाची भयावह स्थिती उत्पन्न करणारे आहेत. विजेवर चालणारी (इलेक्ट्रॉनिक) चिनी उत्पादने तर अगदीच निरुपयोगी आहेत; कारण त्यांचा टिकाऊपणा अतिशय अल्प आहे. त्याद्वारे पर्यावरणास अत्यंत हानीकारक असणारा ‘रेडियोधर्मी’ केरकचर्याचा (ई-डस्ट) भंगार आपल्या देशात गोळा केला जात आहे.’
(साभार : गीता स्वाध्याय, ऑक्टोबर २०११)