भगवंताच्या आड येणार्‍या पत्नीचा त्याग करण्यास सांगणारे श्रीरामकृष्ण परमहंस !

श्रीरामकृष्ण परमहंस

‘मणिकांत हा रामकृष्णांचा अनुग्रहित आहे. २८ वर्षांचा हा युवक विवाहित आहे. भगवंताची, राम-कृष्णाची, सत्संगाची विलक्षण ओढ आहे. त्याच्या पत्नीला ते रूचत नाही. मणिकांत रामकृष्णांना सांगतात, ‘‘पत्नी म्हणते, हे देव-देव बंद केले तर ठीक. नाहीतर मी आत्महत्या करीन. तुमच्यावर हत्येचा दोष लावीन. काय करू मी ?’’

श्रीरामकृष्ण गंभीर होतात. त्यांचे नेत्र चमकतात. ते उद्गारतात, ‘‘भगवंताच्या आड जी पत्नी येते, ती पत्नीच नाही. ती वैरीण ! तिचा त्याग करावा. सोडून दे तिला. भलेही ती आत्महत्या करू देत. हवे ते करू दे ! त्याची चिंता नको ! ईश्‍वराकडे जाण्यासाठी जी अटकाव करते, ती अविद्या ! तिला बाजूलाच सारले पाहिजे.’’

(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०१२)