ज्ञानप्राप्तीच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अद्वितीय तळमळ !
‘जुलै २०१७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला ‘लुंगी’ (मुंडू) या वस्त्राच्या संदर्भातील एका प्रश्नाचे उत्तर सूक्ष्म ज्ञानातून मिळवण्याचा निरोप दिला होता. त्या प्रश्नाच्या मिळालेल्या उत्तरावर त्यांनी २२ उपप्रश्न विचारले आणि पुढे त्या उत्तरांवरही विविध प्रश्न विचारले. त्यामुळे लुंगी या वस्त्रापासून चालू झालेल्या विषयात अन्य वस्त्रांची माहितीपण जोडत गेली. अशी प्रश्नोत्तराची प्रक्रिया जुलै २०१७ ते जुलै २०१८ असे पूर्ण १ वर्ष चालू होती. या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वस्त्रांशी निगडित अंदाजे ७५-८० प्रश्न विचारले असणार. यातून एका विषयाशी निगडित परिपूर्ण ज्ञान माहीत करून घेण्याची त्यांची अद्वितीय तळमळ लक्षात येते.’
– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०१८, दुपारी ११.५१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.