लाभले सद्गुरु श्रीकृष्णरूपी ।
परम पूज्य खरे सांगते तुम्हाला ।
आदल्या दिवशी आठवण होती ।
उद्या आहे वाढदिवस तुमचा ॥ १ ॥
पण हेही खरे की ।
दुसर्या दिवशी मी पूर्ण विसरूनच गेले वाढदिवस तुमचा ।
सकाळी दूरभाष आला एका साधकांचा ।
त्यांनी सांगितले आज आहे वाढदिवस तुमचा ।
मला वाटले वाईट याचे की, किती कर्मदरिद्री मी ।
विसरून गेले वाढदिवस तुमचा ॥ २ ॥
गुरुवर्य, म्हणत होता ना सतत साधकांना ।
साधकांनो तुम्ही जिंकलात, मी हरलो ।
देवा, साधकांनाही घडविले आपणच ना ।
ते म्हणती, परम पूज्य, तुम्हीच जिंकता ।
पण सांगता सर्वांना, मी हरलो तुम्हीच जिंकलात ॥ ३ ॥
साधक म्हणती, गुरुदेव आमुचे आहेत श्रीकृष्ण ।
पण नाकारून तुम्ही म्हणायचात ।
तो असे हो व्यष्टी भाव साधकांचा ।
तुम्ही कितीही म्हटले की, मी नाही कृष्ण ।
पण साधक तर आपलेच ना ।
नाही फसले आपल्या या बोलण्याला ॥ ४ ॥
देवा, शेवटी श्रीकृष्णानेच ठरवले ।
सांगू या साधकांना ।
साजरा करून वाढदिवस सोहळा ।
साधकांनो, खरोखरीच तुम्हीच जिंकलात, मी हरलो ॥ ५ ॥
नाकारून की, मी नाही कृष्ण ।
करूया साजरा वाढदिवसाचा सोहळा ।
करून पुष्पवृष्टी आपल्याच अवतारावर ।
सांगा बरे देवा, आता आहे का नाकारण्या ।
तुमच्याकडे शब्द की, मी नाही कृष्ण ॥ ६ ॥
देवा, दिली जगभरातील साधकांना आनंदाची वार्ता ।
हां हां म्हणता पसरली संपूर्ण जगात ही आनंदाची वार्ता ।
झाली भावजागृती सर्व साधकांची ।
ऐकून अलौकिक आनंदाची वार्ता ।
आहेत आमचे परात्पर गुरु प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अवतार ॥ ७ ॥
सप्तर्षि आले, देव आले ।
अवघे ब्रह्मांड आले करावया पुष्पवृष्टी ।
व्यष्टी-समष्टी संत आले ।
गोप-गोपीही समष्टी राधेसह करावया पुष्पवृष्टी ॥ ८ ॥
देवा, करू कशी व्यक्त कृतज्ञता ।
दिली संधी आमच्यासारख्या पामरांना ।
याच जन्मी, याचि देही दाखवले अलौकिक प्रसंग ।
आम्हा सर्व जगभरातील साधकांना ॥ ९ ॥
करून अवतारत्व सिद्ध ।
याच रामनाथी आश्रमात दाखवले श्रीविष्णुरूप ।
सर्व साधकांना वाटे झाले जीवित सफल ।
बघून भावपूर्ण पुष्पवृष्टी सोहळा ।
‘कृतज्ञता’ असे शब्द थिटा ।
दाखवण्यासाठी हा सोहळा ॥ १० ॥
देवा, किती हो आम्ही भाग्यवान ।
लाभले सद्गुरु श्रीकृष्णरूपी ।
आहे का या काळात ।
कुणी आपल्यासारखे सद्गुरु श्रीकृष्णरूपी ॥ ११ ॥
(परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या पुष्पवृष्टीच्या संदर्भात त्यांनी सुचवलेली शब्दसुमने)
– सौ. माधवी घाटे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०१५)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक