हिंदु राष्ट्राच्या उषःकालाचे गाऊ या यशोगान ।
कलियुगातील कलियुगी या दुष्ट ते माजले ।
अत्याचार आणि अनीतीचे राज्य पहा चालले ।
अधर्म वृत्तीने गाठला आहे आता उच्चांक ।
कारण होईल हे हिंदु राष्ट्र स्थापण्याचे हो ॥ १ ॥
मदाने उन्मत्त जाहले राजकारणी अन् अधिकारी ।
भोगी, विलासी अन् संधीसाधू झाले पापांचे भागीदार ।
रज-तमांचे जाळे पसरले समाजात घनदाट ।
अधर्म आणि रज-तम यांचा होईल नायनाट ॥ २ ॥
पैशासाठी नीच नराधम विकती त्यांचे शील ।
कलियुगातील अशा दुष्टांचे होईल निर्दालन ।
चैतन्याने साधकांचे वाढेल आत्मबल ।
परम पूज्यांच्या (टीप १) कृपेने होईल हिंदु राष्ट्राची पहाट ॥ ३ ॥
प.पू. गुरुदेवांनी रुजवले आहे हिंदु राष्ट्राचे बीज ।
साधक अन् आश्रम आहेत, हिंदु राष्ट्राचे प्रतीक ।
गुरुकृपेने हिंदु राष्ट्र लवकरच येईल हो ।
हिंदु राष्ट्राच्या उषःकालाचे गाऊ या यशोगान ॥ ४ ॥
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.७.२०१९)