परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वापरातील पांढर्या रंगाच्या सदर्याचा रंग पालटून तो काही ठिकाणी गुलाबी होणे
३१.१२.२००९ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या वापरातील पांढर्या रंगाच्या एका बंडीचा रंग हाताच्या बाह्या, पोट आणि छाती या ठिकाणी गुलाबी झाल्याचा दिसला. कपड्यांचे रंग अनेक दिवस वापरून कालांतराने फिकट होतात, हे पाहिले आहे; परंतु पांढर्या कपड्यांचा मूळ रंग जाऊन त्या ठिकाणी दुसरा रंग आल्याचे यापूर्वी पाहिलेले नाही. रंग पालटणे, म्हणजे दैवीतत्त्व प्रगटणे आणि रंग प्रकाशमय होऊन चमकणे, म्हणजे दैवीतत्त्व समष्टी कार्यासाठी कार्यरत होण्याचे लक्षण आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या उच्च कोटीतील संतांचे कार्यच समष्टी कल्याणाचे असल्याने त्यांचा देह, वापरातील वस्तू यांच्या माध्यमातून समष्टीला आवश्यक असलेले तत्त्व कार्यरत होत असते.
साधकांच्या, तसेच प.पू. डॉक्टरांच्या कपड्यांना गुलाबी रंग येण्याच्या प्रक्रियेत आढळलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. तीव्र त्रास असणार्या साधकांच्या कपड्यांना आलेला गुलाबी रंग चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास निघून जाणे
तीव्र त्रास असणार्या साधकांच्या कपड्यांना गुलाबी रंग येण्यास प्रारंभ झाल्यावर हे कपडे विभूती लावून किंवा त्याला श्रीकृष्णाचे चित्र बांधून किंवा एखाद्या चैतन्य असलेल्या ठिकाणी ठेवले असता, ८ दिवसांनी गुलाबी रंगातील मायावीपणा निघून गेल्याने हा रंग हळूहळू निघून जाऊ लागतो, असे आढळले.
२. त्रास नसणार्या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदने असलेल्या साधकांच्या कपड्यांचा गुलाबी रंग चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास वाढणे
त्रास नसलेल्या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदने असलेल्या साधकांच्या कपड्यांना गुलाबी रंग आला असता, हे कपडे चैतन्याच्या सान्निध्यात ठेवल्यावर त्यांच्या गुलाबी रंगात वृद्धी होत असल्याचे दिसून आले.
३. त्रास नसणार्या, तसेच चांगल्या शक्तीची स्पंदनेही नसलेल्या साधकांच्या कपड्यांच्या गुलाबी रंगात चैतन्यमय क्षेत्रात ठेवल्यास अगदी अल्प प्रमाणात चढ-उतार होणे
त्रास नसणार्या; परंतु देहात चांगली शक्ती नसलेल्या साधकांच्या कपड्यांच्या बाबतीत मात्र चैतन्याच्या सान्निध्यात हे कपडे ठेवले असता, त्यांच्या गुलाबी रंगाच्या छटेत अगदी अल्प प्रमाणात चढ-उतार होतात, असे आढळून आले.
४. प.पू. डॉक्टरांच्या कपड्यांना आलेल्या गुलाबी रंगाचे वैशिष्ट्य
अ. ‘या रंगात चमकदारपणाचे, तसेच पारदर्शकपणाचे प्रमाण अधिक असते.
आ. प.पू. डॉक्टरांच्या देहात परिपूर्ण चैतन्य असल्याने त्यांनी वापरलेल्या कपड्यांना सर्वत्र सारखाच, म्हणजेच एकसमान गुलाबी रंग येतो.
इ. या रंगातून दिव्य गंधाचे आणि थंड लहरींचे प्रक्षेपणही होते.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
तज्ञ, अभ्यासू आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !‘संतांच्या वापरातील वस्तूंतील बुद्धीअगम्य पालटांविषयी संशोधन करून त्यांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सदर्यावर गुलाबी छटा येण्यामागे काय कारण आहे ? २. परात्पर गुरु डॉ. आठवले अंघोळीसाठी वापरत असलेल्या मगवर फिकट गुलाबी छटा येण्यामागे काय कारण आहे ? या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’- व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : mav.research2014@gmail.com |
विविध बुद्धीअगम्य पालटांसंदर्भात प.पू. डॉक्टरांचे विश्लेषण‘विविध चांगल्या आणि वाईट अनुभूतींसंदर्भात माझ्या संदर्भातील वस्तूस्थिती ज्ञानेश्वरीत सांगितल्याप्रमाणे पुढीलप्रमाणे आहे. हे मजचिस्तव जाहले । परि म्यां नाहीं केलें । – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी ८१ अर्थ : हे माझ्यामुळे झाले; पण मी केले नाही. यातील ‘मजचिस्तव जाहले’ (माझ्यामुळे झाले), म्हणजे माझ्या अस्तित्वामुळे झाले, यातील ‘मी’पण हे परमेश्वराचे आहे, तर ‘म्यां नाही केलें’ (मी केले नाही), म्हणजे कर्तेपण माझ्याकडे नाही. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे सूर्य उगवतो, तेव्हा सर्व जण उठतात, फुले उमलतात इत्यादी. हे केवळ सूर्याच्या अस्तित्वाने होते. सूर्य कुणाला सांगत नाही की, ‘उठा’ किंवा फुलांना सांगत नाही की, ‘उमला’ !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |