‘आज ना उद्या देह सोडायचाच आहे’, या विचाराने वाईट शक्तींच्या या त्रासांतूनही शिकणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळपरात्पर गुरु डॉ. आठवले एकदा मार्गदर्शनात मला म्हणाले, ‘‘त्रासाचे प्रमाण वाढतच चालले आहे; पण या त्रासांतूनही आपण काहीतरी शिकूया. ते मानवजातीला उपयोगी पडेल. मानवजात शिकली, तर चांगले आहे. आपल्याला काय आज ना उद्या देह सोडायचाच आहे.’’ तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘मीही त्रास होत असतांना तसाच विचार केला. साधकांसाठी आपला प्राण गेला, तरी चालेल; पण अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी प्रयोग थांबवायला नको.’’
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०१८)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः वापरलेल्या वस्तू साधकांना चैतन्य मिळण्यासाठी देणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंत, उदा. बॉलपेन, पेन्सिल, लिहिलेले कागद, फणी, कपडे, तसेच त्यांचे केस इत्यादींमध्ये सकारात्मक शक्ती असल्याचे अनेक चाचण्यांत सिद्ध झाले आहे आणि साधकांना तशा अनुभूतीही आल्या आहेत. हे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतः वापरलेल्या वस्तू साधकांना चैतन्य मिळण्यासाठी देण्यास २० वर्षांपूर्वी आरंभ केला. ‘साधकांना सकारात्मक शक्ती मिळावी’ म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या वस्तू साधकांना खोलीतील कपाटात किंवा अंथरुणाखाली ठेवण्यास देतात. इतर संत भक्तांना विभूती देतात, तर परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना चैतन्य मिळण्यासाठी या वस्तू द्यायचे !’
– (पू.) श्री. संदीप आळशी
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.